Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Yalkot [Marathi] Book

ISBN: 8171854397

ISBN13: 9788171854394

Yalkot [Marathi]

बिनमौजेच्या गोष्टींमधली वेगळीच मौज शोधणारे, आपली स्वतंत्र तिरकस लेखनशैली निर्माण करणारे श्याम मनोहर हे महत्त्वाचे नाटककार. नाट्यतंत्राच्या आहारी न जाता ते मोकळेपणाने पण उपहासाने, वेगळ्या निरीक्षण शक्तीने आशय अधोरेखित करतात. ही मनोहारी शैली नाट्य दिग्दर्शकाला एक आव्हानच ठरते. त्यांची हृदय आणि यळकोट ही दोन नाटकं दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली. मुंबईला व्यावसायिक रंगभूमीवर एका पाठोपाठ नाटकं करत असतानाच यळकोट नाटक माझ्या हाती आलं. व्यावसायिक प्रायोगिक असा अग्रक्रम किंवा भेदाभेद मी कधीच केला नाही. जे नाटक त्याक्षणी ज्या मंचावर करावंसं वाटलं ते मी बेधडकपणे केलं. यळकोट वाचून मी अक्षरश उडालोच. यातले संवाद कोणते नटनट्या बोलतील? इनॅक्ट करूशकतील? कुठली संस्था हे नाटक उभं करायला तयार होईल ? हे प्रेक्षकांना रुचेल, झेपेल ? त्यातला वरवरचा बोल्डनेस झटकून टाकून त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल ? असे असंख्य प्रश्न आ वासून उभे राहिले. पण नाटक आतून आवडलं होतं. त्याची काहीतरी अर्थपूर्ण गंमत मला दिग्दर्शक म्हणून खुणावत होती. दिग्दर्शक म्हणून एका थिएटर गेमच्या पेसने मी जाणीवपूर्वक वेगवान हालचाली आणि क

Recommended

Format: Paperback

Temporarily Unavailable

We receive fewer than 1 copy every 6 months.

Save to List

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2026 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured