शिर्डी साईबाबांचे भक्त भारत तसेच परदेशांतही पसरलेले आहेत. हे सर्व भक्त त्यांच्याकडे आले ते आध्यात्मिक ओढ आणि शिर्डी साईंचा प्रेमळपणा, साधेपणा यामुळे. या पुस्तकामध्ये शिर्डी साईंच्या जीवनाचा बांधीव आणि शक्य तितक्या कालक्रमानुसार दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामध्ये काही प्राथमिक स्रोत आणिकागदपत्रे वापरलेली आहेत, जी आजपर्यंत उजेडात आलेली नव्हती त्यामुळे लोकांच्या मनात बाबांशी संबंधित प्रश्नांबद्दल काही गृहीतके रेंगाळत राहिली. ही कागदपत्रे लेखकानेविविध स्रोतांद्वारे एकत्रित केली आहेत. अतिवर्णनात्मकता टाळून लेखकाने सरळ, साध्या शैलीत साईबाबंविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शिर्डी साईबाबांचे दिव्य व्यक्तिमत्त्व, उदात्तहेतू, तत्त्वज्ञान हे भक्तांच्या, वाचकांच्याआणि इतर संशोधकांच्या सहज समोर येते. शिर्डी साईबाबांवर भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांच्यावरील पहिले पुस्तक श्री साईसच्चरित हे १९२९मध्ये श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांनी प्रकाशित केलेले पुस्तक मुख्य संदर्भ म्हणून वापरल
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.