माणसाने मौज वा साहस यांच्यासाठी केलेली शिकारच नाही, तर विजवाहिन्या, धरणे, खाणी, युद्धे, विमान वाहतूक आणि उपभोगाचा हव्यास, वन्य पशु-पक्षी-कीटक-वनस्पती यांच्यासह हवा-माती-पाणी अशा प्रत्येक निसर्गघटकासाठी धोकादायकच आहे. पर्वतरांगा नद्या-समुद्र-वाळवंट जंगले सगळ्यांच्याच विध्वंसात दिवसेंदिवस पडणारी भर या 'विनाशक विकासा'चा नव्याने विचार करायला भाग पाडतात. मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी बीएनएचएससारख्या संस्था, निसर्गशास्त्रज्ञ कसे प्रयत्न करत असतात, हे समजून घेणे कुतूहलपूर्ण आणि मनोरंजक आहे. बीएनएचएसचे संचालक असणारे लेखक किशोर रिठे यांच्या ज्ञानाचा आवाका आणि ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे कौशल्य वादातीत आहे. निसर्गसंवर्धनासाठी गेली तीन दशके काम करणारे आणि 'वने, वन्य प्राणी व पर्यावरण विषयक राष्ट्रीय धोरण समिती'चे सदस्य असणारे किशोर आपल्याला संरक्षण-संवर्धनाच्या नव्या दिशाही दाखवतात. म्हणूनच हे पुस्तक आपल्याला उद्याविषयी आशा देते मनुष्य निसर्गाचा एक घटक आहे; मालक नाही. सर्व निसर्गघटकांचा आदर राखत, सोबत जगलो तरच आपले अस्तित्वही टिकणार आहे; हे 'शहाणपण देणा
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.