भामटी ही मूळची राजस्थानातील सैनिकी पेशा असलेली भटकी विमुक्त जमात. बोरूपासून ताग बनविण्याचा मूळ व्यवसाय इमाने इतबारे करणाऱ्या या जमातीला इंग्रज राजवटीत चोर - दरोडेखोर ठरविले गेले. कायमच गावकुसाबाहेर जगणाऱ्या या जमातीकडे मग स्वतःचे असे गावच उरले नाही. अन्याय, अत्याचार मुकाट्याने सोसत एका गावाहून दुसऱ्या गावी भटकणाऱ्या या जमातीचे हेलावून टाकणारे चित्रण हे ''घेरं'' या कादंबरीचे बलस्थान आहे. लेखकाविषयी लेखक डॉ. वासुदेव डहाके यांनी श्री. पंढरीनाथ महाविद्यालय, नागपूर येथे ३० वर्षे अध्यापन केले आहे. कथा, कविता, वैचारिक आणि समीक्षात्मक लेखन यांवर आधारित त्यांची एकूण १२ पुस्तके प्रकाशित आहेत. साहित्यिक आणि सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. गेल्या तीस वर्षांपासून ते भटक्या-विमुक्त जातींचे प्रबोधन, सामाजिक विषयांवर सातत्याने संशोधन करत असतात.
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.