प्रभा गणोरकरांच्या 'व्यामोह' या कवितासंग्रहाची सुरुवातच बालकवींच्या 'हृदयाची गुंतागुंत' या कवितेतील उद्धृताने होते आणि मग या संग्रहातील ७२ कविता वाचताना त्या कवितांच्या व्यामोहाने आपलाही जीव दडपत जातो. कवितेच्या निवेदिकेच्या मनात साचून आलेली औदासिन्याची भावना प्रतीत होत राहते. प्रभाताईंची कविता विलक्षण आत्ममग्न आहे. वाचकानुनय तर राहोच, पण निवेदिकेच्या अंतर्विश्वात वाचकाला सामावून घेण्यासाठी म्हणूनसुद्धा त्याबद्दलचा एखादा तपशील ती देत नाही. गणोरकरांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलते आणि त्या बव्हंशी निसर्गप्रतिमा असतात. क्वचितच कधीतरी 'लिफ्ट'सारखी शहरी प्रतिमाही त्यांच्या कवितेत येते मात्र एरव्ही भेटतात त्या पाऊस, नदी, झाडे, पाने, फुले, पाखरे यांसारख्या सर्वसामान्य निसर्गप्रतिमाच. कधीतरीच त्या विशिष्ठ होतात, जसे 'तंतुएवढे पाय हलवीत निघणारे लाल इंद्रगोप' (आज, प्रिय आई), अन्यथा त्या समुद्रातून चालताना सरकणारी पायाखालची वाळू, झिजलेले दगड उराशी घेऊन जुन्या करण्याचे प्रतिबिंब वागवीत पडून असलेली नदी, उघडी पडलेली मुळे, डोंगरात धडाडून पेटलेले वणवे अशा प्रतिमाच त्यांच्या कवितेत प्रामुख्याने &
ThriftBooks sells millions of used books at the lowest
everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We
deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15.
ThriftBooks.com. Read more. Spend less.