बारावीनंतर पूर्ण करता येऊ शकतील अशा ६९ पदव्यांची सांगोपांग माहिती देण्याचा प्रयत्न 'माझी पदवी माझे करिअर' या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. विजय नवले यांनी केला आहे. करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रातील आपल्या २७ वर्षांच्या अनुभवाचे सार ह्या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या हाती ठेवले आहे. प्रत्येक पदवीसाठी एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे. प्रत्येक प्रकरणात त्या-त्या पदवीसाठीची पात्रता, तिचा कालावधी, प्रवेशपरीक्षा, अभ्यासक्रमाचे स्वरूप, अभ्यासक्रमातील प्रमुख विषय, पदवी मिळवल्यानंतर खुले होणारे उच्च शिक्षणाचे पर्याय, करिअरच्या संधी, भविष्यातील वाव आदींचा समावेश करण्यात आला आहे. एखाद्या पदवीला प्रवेश घेण्यापूर्वी कोणती स्वाभाविक कौशल्ये विद्यार्थ्याच्या अंगी असणे अपेक्षित आहे, याची कल्पना 'कोणी प्रवेश घ्यावा?' ह्या मुद्द्याखाली देण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जी कौशल्ये विकसित होणे अपेक्षित आहे, त्यांचीही यादी देण्यात आली आहे. काही पदव्यांकरिता सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील संधींचे स्वतंत्रपणे विवेचन- वेतनमानासह- करण्
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.