गुजराती भाषा शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या मराठी भाषकांना गुजराती भाषेचा परिचय व्हावा व प्राथमिक स्तरावर त्याचा उपयोग करता यावा या हेतूने हे पुस्तक साकारले आहे. गुजराती शब्दसंग्रह, निवडक वाक्प्रचार व म्हणी व नित्योपयोगी संवादासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीतून गुजराती भाषेचा सोप्या शैलीत परिचय करून देण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे, तसेच गुजराती राज्याचा सांस्कृतिक परिचयही दिला आहे.