भगवद्गीता, केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे. गीता आपल्याला काठावर उभी राहून निव्वळ कोरडे तत्त्वज्ञान सांगत नाही. तर आपण सर्व समस्यांमधून, स्वतःला सावरून उत्तर शोधावं, ह्यासाठी मायेचा हात पुढे करते. ह्या दीपस्तंभाच्या उर्जादायी प्रकाशस्त्रोतामध्ये कुणीही यावं आणि आयुष्य उजळून टाकावं हे तिचं अंगभूत सामर्थ्य आहे. काळानुरूप परिस्थिती बदलते. समाज रचना, परंपरा बदलत रहातात. पण माणसाची अमर्याद लालसा आणि त्या विरुद्ध उभी रहाणारी निस्पृहता यांच्यातील संघर्ष मात्र चिरंतन सुरूच रहातो. इथे गीता आपल्याला शाश्वत नितीमूल्यांकडे निर्देश करून सांगते की, केवळ सत्गुणांच्या अधिष्ठानावरच आपल्याला सुसंस्कृत आणि सभ्य जीवनाची अपेक्षा करता येते. व्यक्तीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थांमध्ये, धर्माधिष्ठीत मर्यादांमध्ये राहूनच आणि कामाचा उपभोग घ्यावा आणि मोक्षाकडे वाटचाल करावी. ही संयमित मानसिकता निर्माण करण्यासाठीच गीतेेचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. गीतेचा कटाक्ष केवळ व्यक्तिगत मोक्षप्राप्तीवर नसून, गीतेने मोक्षाची परिभाषा व्यापक क
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.