बेगम बर्वे' वैयक्तिक शारीर-मानस असोशीबद्दल, साकार न झालेल्या इच्छांबद्दल, चिरंतन अव्याहत वेदनांबद्दल, कोंडलेल्या लैंगिकतेबद्दल आहे; तसंच ते सामाजिक दडपणांबद्दल, शोषितांच्या अस्फुट आक्रोशांबद्दल, मध्यमवर्गीय संकुचित जाणिवांबद्दल, आर्थिक दमनाबद्दलही आहे. हे अभिजाततेच्या अंगाने फुलणारं नाटक एक करुण लोकनाटक होऊन जातं. 'महानिर्वाण' बाह्य/सामजिक दडपणांबद्दल, पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेबद्दल. सनातन, कर्मठ, जाचक धर्मरूढींबद्दल, धर्माच्या सत्ताकारणाबद्दल, परिवर्तनशक्य अशा वर्तमानातील शाश्वत सामाजिकतेबद्दल आहे; तितकंच ते अंतर्गत मानसिक घुसमटीबद्दल, लैंगिक असमाधानाबद्दल, नागरी नियंत्रणाबद्दल. कदाचित अटळ अशा दुर्दैवी शाश्चत मानसिकतेबद्दलही आहे. हे लोकघाटणीच्या जवळ जाणारं, नाटक हळूहळू दाटपणे अभिजात बनतं. ही दोन्ही नाटक हसण्याच्या मार्गाने कारुण्याच्या घामाला नेतात. व्यक्तीच्या सुखदु खांबद्दल आणि समाजाच्या रचना व्यवस्थेबद्दल बोलतात. ही नाटक एकाच वेळी लोकरंगी व अभिजात होतात; धार्मिक, आर्थिक, लैंगिक राजकारण मांडतात आणि आर्तपणे काही पुकारतातही. 'महानिर्वाण'मधे 'आवा चालली पंढरपुरा' म्हणताना भाऊर
ThriftBooks sells millions of used books at the lowest
everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We
deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15.
ThriftBooks.com. Read more. Spend less.